बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं पण…’ – रूपाली ठोंबरे

मुंबई | रूपाली ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (MNS) सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच राजीनामा देत पाटील यांनी मनसेला मोठा धक्का दिला.

मनसेला रामराम ठोकल्यानंतर रूपाली पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या स्वार्थासाठी मी राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्ते यांना वाईट बोलणार नाही. पक्षाच्या चौकटीत राहून मनसेच्या काही नेत्यांसंदर्भातील अडचण मी राज ठाकरेंना कळवली आहे. पण काही कारणांमुळे मी राजीनामा देत आहे’, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.

‘संदीप देशपांडे आणि मी भावंड म्हणून काम केलं. मी पण त्यांच्याबरोबरच तयार झालेली आहे. वसंत मोरे असतील किंवा संदीप देशपांडे मी त्यांना आत्ता उत्तर देणार नाही. मी त्यांना योग्य वेळ आल्यावर उत्तर देणार’, असा इशारा देखील रूपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.

दरम्यान, माझ्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेची (Shivsena) ऑफर असल्याचा खुलासा रूपाली पाटील यांनी केला आहे. माझ्या खळखट्याक स्टाईलनं स्वीकारतील त्या पक्षात जाईन. तोपर्यंत माझ्या प्रतिष्ठानाचं काम करेन, असंही रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

भाजप खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘सध्याचे हेच हिंदू तेव्हा पळून गेले होते’; संजय राऊतांचा घणाघात

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

‘आईच्या इज्जतीची पर्वा आहे की नाही’; …म्हणून अभिनेत्रीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना

महेश मांजरेकरांनी सोडला ‘बिग बॉस’; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More