“चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकून, त्यावरही उत्तर मागाल”
मुंबई | काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हि़डीओ प्रचंड व्हायरल झाला. यामध्ये शहाजी बापू पाटील फेम काय झाडी… या गाण्याचा वापर केला होता. यात ते एका महिलेसोबत असल्याचं दिसून आलं. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काय नाना तुम्ही पण काय झाडी, काय डोंगर, काय हॅाटील, असा प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. याचा समाचार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) रुपाली ठोंबरे पाटील यांनी घेतला आहे.
तुम्ही उद्या ब्लू फिल्म सोशल मिडीयावर टाकाल आणि त्याचंही उत्तर मागाल, असं कुठे करतात का चित्रा ताई?, असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी विचारला आहे. तुम्हाला विरोधी पक्षाच्या नेत्याच्या खासगी आयुष्यात ताकझाक करण्याशिवाय दुसरं काम राहिलेलं नाही वाटतं, असंही त्या म्हणाल्या.
नाना पटोलेंच्या खासगी आयुष्यातील व्हिडीओ ट्विट(Tweet) करण्याचं प्रयोजन काय?, तो व्हिडीओ खरा की खोटा याची पडळतानी केली का? त्या महिलेने त्रास झाल्याची कोणती तक्रार तीने केली का? एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळा ढवळा करु नका. का लोकांची घर बरवाद करताय चित्राताई?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
काही दिवसांपूर्वी एका भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला त्यात ती महिला त्या नेत्याचं नाव घेऊन यानं मला फसवल्याचा आरोप करत होती यावर तुम्ही गप्प का बसला होता. संजय राठोड यांनीही एका तरूणीची फसवणूक केली तिचा बळी घेतला, असा आरोप तुम्ही केला होता. आता मात्र तुम्ही शांत का? ते तुमच्या पक्षात आले म्हणून शांत बसला आहात काय?, असंही त्या म्हणाल्यात.
थोडक्यात बातम्या
“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये”
राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका!
मोठी बातमी! राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय
“शिंदे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच तुम्ही लिहुन घ्या”
अत्यंत सुमार दर्जाचा ट्रेलर!, ‘मी पुन्हा येईन’ फ्लॉप होण्याची शक्यता
Comments are closed.