Top News कोल्हापूर पुणे महाराष्ट्र

फास्ट-टॅगवरून मनसे नेत्या रूपाली ठोंबरेंचा टोल नाक्यावर राडा, व्हिडीओ व्हायरल!

Photo Courtesy- Facebook/Rupali Thombare Video Screenshot

कोल्हापूर | 15 फेब्रुवारी पासून संपूर्ण देशात वाहनांना फास्ट-टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या गाड्यांना फास्ट-टॅग नसेल अशा वाहन चालकांकडून दुप्पट टोल वसुली केली जाणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घोषित केलं होतं.

फास्ट-टॅगमुळे टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कमी करण्याचा प्रयत्न असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात काही टोल नाक्यांवर वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. फास्ट-टॅग असूनही कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर वाहनांच्या 7 किमी पर्यंत रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.

मनसे नेत्या रुपाली ठोंबरे या कोल्हापूर ते पुणे मार्गावर प्रवास करत असताना त्यांना या गोष्टीची चिड आल्याने त्यांनी टोलच्या कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. रूपाली ठोंबरे स्वतः बॅरीअर हटवून गाड्यांना जाण्याचे आदेश देत होत्या. यावरून त्यांची टोल कर्मचाऱ्यांशी तू-तू, मै-मै देखील झाली.

दरम्यान, रूपाली ठोंबरेंनी एक व्हिडिओ पोस्ट करून टोल नाक्यावर सुरू असलेला प्रकार दाखवला आहे. या संदर्भात पहिल्यांदा टोल नाक्यावरील रांगा कमी करा आणि त्यानंतर दुप्पट टोल वसुली करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू, असा इशारा देखील रूपाली पाटील यांनी यावेली दिला.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या

पुढील दोन दिवसांत ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

तयार राहा, माझं आणखी एक गाणं येतंय- अमृता फडणवीस

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राहिले फक्त एवढे दिवस!

200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धरपकड सुरु; पुण्यातील या कारवाईनं गुंडांचे धाबे दणाणले!

नवीन कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्याच फायद्याचे- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या