बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पवार साहेबांमुळे शिवसेनेने भाजपला योग्य जागा दाखवली’; रूपाली ठोंबरेंचा घणाघात

मुंबई | नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी भारतीय जनता पक्षावर टीकेची तोफ डागली आहे. मुंडे साहेबांना विसरलेली भाजपा महायुतीला तरी कशी जिवंत ठेवणार?, असा खोचक सवाल रूपाली ठोंबरेंनी उपस्थित केला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) साहेबांमुळे शिवसेनेने (Shivsena) भाजपला योग्य वेळी जागा दाखवली, असा घणाघात रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. तर भाजप (BJP) स्व.गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना विसरली असल्याचा आरोप देखील रूपाली ठोंबरेंनी केला आहे.

भाजपसोबत लढणाऱ्या मित्र पक्षांना देखील रूपाली ठोंबरेंनी इशारा दिला आहे. ‘सावधान! कमळाच्या चिन्हावर लढणारी रासपा, शिवसंग्राम, रिपाई शेवटच्या घटका मोजत आहेत’, असे वक्तव्य रूपाली ठोंबरे यांनी केले आहे.

दरम्यान, रूपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला (MNS) रामराम ठोकल्यानंतर काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेशापासूनच रूपाली ठोंबरे भाजप विरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“लाज न लज्जा,…तरीही रिकामटेकडे मलिक बिनबुडाचे आरोप करतायेत”

आदित्य ठाकरे दिसताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ

“भाजपचं हिंदुत्व जर चोर बाजार असेल तर शिवसेनेचं हिंदुत्व भेंडी बाजार आहे”

“मी मुस्लीम असूनही कधीच मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही,” ‘या’ अभिनेत्रीचा खुलासा

आज इंधनदरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More