sadabhau khot | भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेमुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. पवारांना महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, आता महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? असं वादग्रस्त वक्तव्य खोत यांनी केलं आहे. यावरून महाविकास आघाडीकडून जोरदार टीका केली जाते आहे. पवारांच्या आजारपणावरून अशा शब्दात टीका केल्याने सदाभाऊ खोत आता विरोधकांकडून टार्गेट होत आहेत.अशात अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare ) यांनीही सदाभाऊ (sadabhau khot ) यांना खडेबोल सुनावले आहेत.
“सदा खोत तुम्ही जी मा.शरदजी पवार साहेब यांच्या बाबतीत भाषा वापरलेली ती अत्यंत असभ्य आहे,अशोभनीय आहे. आपण त्वरित माफी मागितली पाहिजे.दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. नाहीतर बुक्कीत ठेंगुळ निघेल.जरा बोलताना भान ठेवून बोलत जावा. पक्ष वेगळे असेल तरी राजकारणातील लोक प्रतिनिधीनी बोलताना भान ठेवलेच पाहिजे. सदा खोत जाहीर निषेध असली भाषा चालणार नाही.”, अशी पोस्ट रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकवर केली आहे.
सदाभाऊ खोत काय म्हणाले होते?
शरद पवार यांनी बँका हाणल्या आहेत. तसेच कारखाना देखील हाणाला आहे, पण आता शरद पवारांनी येवढं हाणलं तरी ते भाषणात म्हणतात की, मला महाराष्ट्र बदलायचा आहे. तसेच मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा? आता महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा खोचक सवाल करत सदाभाऊ खोत (sadabhau khot ) यांनी शरद पवारांवर टीका केली होती.
तसंच, विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांना विजयी करा. तसेच गोपीचंद पडळकर यांना विधानसभामध्ये पाठवायचे आहे. तर विरोधक हा कुंभकर्णच्या अवस्थेत गेला पाहिजे असं सदाभाऊ खोत म्हणाले होते. गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या दिग्गज नेत्यांची सभा पार पडली. याच सभेत सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली. विशेष म्हणजे, सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती.
अजित पवार यांचा महायुतीला इशारा
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाचार घेतला आहे. “ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत (sadabhau khot ) यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही.”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
News Title – Rupali Thombare Criticism on sadabhau khot
महत्त्वाच्या बातम्या-
आज देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणत्या राशी होणार धनवान?, वाचा गुरुवारचे राशीभविष्य
निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकरांचा काँग्रेसला झटका!
अजित पवारांना पक्ष चिन्हावरून मोठा झटका!
नणंद बाईकडे कडक नोटा आहेत; नवनीत राणांचा कोणावर हल्ला?
शरद पवार ‘महाराष्ट्र’ तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल