Top News

सगळीकडून टीका होतेय म्हणून भाजप ‘जाणता राजा’चा मुद्दा उकरत आहेत- रुपाली ठोंबरे पाटील

पुणे | भाजपचे नेते आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार घणाघात केला आहे. हा वाद ताजा असतानाच या वादात मनसेनेच्या रुपाली पाटील ठोंबरेंनीही उडी घेतली आहे. या ‘जाणता राजा’ प्रकरणावरुन रुपाली पाटील ठोंबरेंनी भाजपला धारेवर धरलं आहे.

आता मोदींवर टीका होत आहे, म्हणूनच त्यांच्या पक्षातील लोक जुनं काहीतरी उकरून वेळ मारून नेत असून ही बाब छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज किंवा मावळे यांना नक्कीच शोभणारी नाही, असं म्हणत मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

कोणी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज म्हणणे किंवा कोणी स्वतःची तुलना महाराजांशी करणे हे निषेधार्यच आहे . तसेच जसा छत्रपतींच्या वंशजांना महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. तसाच हा अधिकार आमच्यासारख्या शिवरायांच्या कडवट मावळ्यांना सुद्धा आहे.

वर्षानुवर्ष जाणता राजा बिरूद वापरत असतांना तुम्ही विरोधात साधा उच्चारही केला नाही आणि आता महाराजांबरोबर तुलना केली म्हणून टीका होत असताना ही बचाव करण्याची खेळी भाजप खेळत असल्याचं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या