बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…अन् तिथेच राज ठाकरेंसारख्या फायरब्रँड नेत्याचं फ्लॉवर झालं”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाडवा मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. शिवतीर्थावर बोलताना राज ठारकेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सडकून टीका केली. जातीवादाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती.

राज ठाकरेंच्या भाषणावरून टीका टीप्पणी सुरू असताना नुकत्याच मनसेतून (MNS) राष्ट्रवादीत (NCP) गेलेल्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी या भाषणाचा खरपूस समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीत अजिबात जातीयवाद नसून सगळ्या जाती, धर्म व पंथाची लोकं या पक्षात असल्याचं रूपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे फायरब्रँड नेते आहेत. ईडीच्या (ED) नोटीसीने फायरब्रँड असलेले नेते फ्लॉवर का झाले?, असा खोचक सवाल रूपाली ठोंबरे यांनी उपस्थित केला आहे. तर भाजपकडून जी ईडीची सूडबुद्धीने कारवाई झाली, तिथे कुठेतरी फायरब्रँड नेत्याचं फ्लॉवर झालं आहे, असा टोला रूपाली ठोंबरे यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज ठाकरे जे गुडीपाडवा मेळाव्यात बोलले ती भाजपचीच स्क्रिप्ट असल्याची टीका देखील रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्लाबोल केला मात्र भाजपवर (BJP) टीका करणं टाळलं. यामुळे राजकीय वर्तुळात भाजप-मनसे युतीच्या चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या-

विराट-अनुष्काकडे आहे ‘इतकी’ संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल

40 दिवसांपासून ना अन्न आहे ना पाणी, युक्रेनियन नागरिकांची बिकट परिस्थिती

14 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना, वाचा आजचे दर

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ CNG च्या दरातही वाढ; वाचा आजचे दर

राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More