बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठोंबरेंच्या पक्षप्रवेशानंतर अजित पवार म्हणतात, ‘रुपालीताई डॅशिंग नेत्या, मात्र…’

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) फायरब्रॅंड नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. रूपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर रूपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी रूपालीताई डॅशिंग आणि आक्रमक नेत्या असल्याचं म्हटलं आहे.

यावेळी अजित पवार यांनी रूपाली पाटील ठोंबरे या आक्रमक नेत्या आहेत. त्यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. त्या मनसेत अतिशय चांगल काम करत होत्या. आज त्यांच्यासह 10 महिलांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. मी पक्ष प्रवेशावेळी उपस्थित होतो. पुण्यात मोठा मेळावा घेवू. त्यावेळी इतरांना पक्षात प्रवेश देऊ, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

तसेच रूपाली ताईंच्या कामाची पद्धत चांगली आहे. त्यांचं काम पुणे शहराला माहित आहे. हातात घेतलेलं कोणतीही काम त्या तडिस नेतात. त्यांच्या प्रवेशामुळे शहरात जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे. त्याचा 100 टक्के फायदा होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठण्याच्या निर्णयावर वर अजित पवारांनी   भाष्य केलं आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या लढाईमध्ये शरद पवारांनी लक्ष घातलं होतं. मंत्री दिलीप वळसे पाटील (Minister Dilip Walse Patil), जयंत पाटील (Minister Jayant Patil), खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांच्यासारख्या नेत्यांनी तसेच अनेक सामाजित कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीन लढली, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

गुगलचा कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

रोहित पाटलांच्या बघून घेतोच्या भाषेवर अजित पवार म्हणाले…

देशभर गाजलेल्या शीना बोरा प्रकरणात मोठा ट्विस्ट; इंद्राणी मुखर्जीनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

बीसीसीआयशी पंगा घेणाऱ्या विराटला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले…

‘हे लोकशाहीत चालतं का?’, अजित पवारांनी राज्यपालांना सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More