बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील मजुरांना दिलासा; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई | कोरोनाच्या संकटकाळात मजुरांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 3 मे पर्यंत देशभरात लॉकडाउन आहे.

12 लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजारांची मदत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यातील मजुरांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत.

लॉकडाउनचे सर्वाधिक चटके बसत आहेत ते मजूर वर्गाला. त्यांना काहीसा का होईना आर्थिक दिलासा देता यावा म्हणून हा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

सध्या सगळ्या प्रकारची बांधकामं बंद आहेत. त्यामुळे या मजुरांवर बेकारीचं संकट ओढवलं आहे. अशा परिस्थितीत इतर राज्यांनीही मजुरांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारनेही मदतीचा हात या सगळ्यांना दिला आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“तीन महिने घरभाडे पुढे ढकलून काय होणार?, सरकारने त्या तीन महिन्यांचं भाडं भरावं”

संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’; मदतीचा हात दिल्याबद्दल कौतुक

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाशी लढा देणाऱ्यांसाठी 45 खोल्यांचं हॉटेल खुलं; शिवसेना नगरसेवकाचा निर्णय

मॉर्निंग वॉकला गेलेल्या पिंपरी चिंचवडच्या माजी महापौरांना पोलिसांनी करायला लावली कवायत!

“जामीन हवा असेल तर PM Cares Fund साठी 35 हजार द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More