ऋषी कपूरही प्रियाचे दिवाने, म्हणाले,”माझ्यावेळी कुठे होतीस?”

मुंबई | गेल्या 4 दिवसात नॅशनल क्रश बनलेली नवोदित अभिनेत्री प्रिया प्रकाशने भल्याभल्याना दिवाना केलं आहे. आता जेष्ठ अभिनेते ऋषी कपूरही तिचे फॅन बनले आहेत.

“माझ्या वेळी तू कुठे होती?, तेव्हा का नाही आलीस?” असा सवाल ऋषी कपूर यांनी ट्विटरवरुन विचारलाय.

या मुलीला प्रचंड स्टारडम मिळेल. प्रिया ही व्यक्त होणारी आणि निरागस मुलगी आहे. तुझ्या वयोगटातल्या मुलींसाठी भावी कारकीर्दीची शर्यत तू भलतीच कठीण करुन ठेवणार आहेस. खूप मोठी होशील.. तुला खूप खूप शुभेच्छा..” असंही ऋषी कपूर यांनी म्हटलंय.