कीव | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन आता 28 दिवस उलटले आहेत. युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती भयावह असताना रशियाकडून (Russia) युक्रेनवरील हल्ले दिवसेंदिवस तीव्र केले जात आहेत. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
रशियाकडून होणारे बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले यामुळे युक्रेन आधीच हादरलं असताना रशियाने धक्कादायक पाऊल उचललं आहे. युक्रेनच्या मारियुपोल शहरावर ताबा मिळवण्यासाठी रशियाने भयानक अशा फॉस्फरस बॉम्बचा (Phosphorous Bomb) प्रयोग केला आहे. फॉस्फरस बॉम्ब इतका घातक आहे की याच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा तात्काळ मृत्यू होतो.
मारियुपोल शहरावर रशियाने याच फॉस्फरस बॉम्बने हल्ला केला असल्याचा आरोप युक्रेनकडून करण्याता आला आहे. रशियाने असे हल्ले जर अधिक तीव्र केले तर युक्रेनीयन लोकांच्या जगण्याचा प्रश्न आणखी बिकट होऊ शकतो.
दरम्यान, कोणत्याही युद्धात जैविक बॉम्बचा वापर घातक मानला जातो. त्यामुळे युद्धादरम्यान कोणत्याही जैविक साधनांचा वापर न करण्याचा इशारा अमेरिकेने (America) रशियाला दिला होता. मात्र, युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाने फॉस्फरस बॉम्बचा वापर करत सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
सर्वसामान्यांना धक्का, सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा ताजे दर
‘मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणे’; व्हिडीओ शेअर करत मनसेची तुफान टोलेबाजी
“बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत उद्धव ठाकरे राजीनामा देणार का?”
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
टेन्शन वाढलं! महाराष्ट्रातील Deltacron रूग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर
Comments are closed.