बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! अमेरिकेचा रशियाला जोरदार झटका

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) आता 40 दिवसांपेक्षाही जास्त कालावधी उलटला आहे. दिवसेंदिवस रशियाने (Russia) युक्रेनवरील (Ukraine) हल्ले तीव्र केले असताना जगभरातून रशियाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

युक्रेनमधील बुचा शहरात झालेल्या घटनेवरून अमेरिकेने रशियाविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून (UNHRC) बेदखल करण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) मतदान झाले. मतदानानंतर रशियाला UNHRC मधून निलंबित करण्यात आलं आहे.

बुचा शहरातील हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाला UNHRC मधून निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावेळी 93 मते या प्रस्तावाच्या बाजूने पडली तर 24 मते विरोधात पडली. भारतासह तब्बल 58 देशांनी या मतदानात सहभाग घेतला नाही.

दरम्यान, रशियन संघाचे निलंबन करणे हा पर्याय नसून एक कर्तव्य असल्याचं युक्रेनचे प्रतिनिधी म्हणाले. तर अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले होते. त्यानंतर आता रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका म्हणजे एटीएम, नोटा छापण्याची एक मशीन”

मनसेवर नाराज वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंची खास ऑफर

छगन भुजबळांनी केली अनिल देशमुखांची पाठराखण, म्हणाले…

कोरोना निर्बंध हटवल्यानंतर राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! शिवसेना नेते यशवंत जाधव यांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More