बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रशिया युक्रेनवर ‘हा’ मोठा हल्ला करण्याच्या तयारीत?, अमेरिकेने दिला सतर्कतेचा इशारा

कीव | रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा करत युक्रेन विरूद्ध युद्धाला सुरूवात केली. युक्रेनमध्ये परिस्थिती भयावह असताना रशिया-युक्रेन युद्ध आज पंधराव्या दिवशीही सुरूच आहे. त्यात रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. (Russia-Ukraine War)

रशियाकडून (Russia) होणारे बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले, गोळीबार यामुळे युक्रेन (Ukraine) हदरलं आहे. रशियाने युक्रेनवर हल्ल्याची तीव्रता वाढवली असताना अमेरिकेने युक्रेनला अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. रशिया युक्रेनवर रासायनिक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.

रशिया युक्रेनवर रासायनिक किंवा जैविक शस्त्रास्त्र हल्ल्याची (Chemical Attack) योजना करत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे, असं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे. तर अमेरिकेच्या जैविक शास्त्रांच्या प्रयोगशाळा आणि युक्रेनमधील रासायनिक अस्त्रांच्या विकासाबाबत रशियाचे दावे चुकीचे असल्याचं प्रेस सेक्रेटरी जैन साकी म्हटले.

दरम्यान, रशियाचे हे खोटे दावे पुढील पूर्वनियोजित आणि प्रक्षोभित हल्ल्यांचे समर्थन करण्यासाठी आहेत. रशिया चाल खेळत आहे. अमेरिकेने युक्रेनमध्ये संभाव्य रशियन रासायनिक हल्ल्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती जेन साकी यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, गोव्यात मुख्यमंत्री कोणाचा?

कुणाला मिळणार जनतेचा कौल?; 5 राज्यांचं भवितव्य ठरणार

“…हे तर लोकशाहीचा गळा घोटण्यासारखंच”, उच्च न्यायालयाचे ताशेरे

“घातपाताची आम्हाला शंका होती, आतमध्ये सगळे एकमेकांवर आदळत होते अन्…”

“1993च्या बॉम्बस्फोटाच्या जखमा अजूनही ताज्या, उद्धवजी मांडीला मांडी लावून…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More