बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Russia-Ukrain War | भारतीय नागरिकांना दुतवासानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेनमधील वाद चिघळत चालल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता रशिया युक्रेनवर हल्ला करणार असल्याचं समोर आलं आहे. युक्रेनच्या (Ukraine) सीमेवर रशियाने (Russia) मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. त्यामुळे वातावरण आणखीनच चिघळण्याची शक्यता दिसत आहे.

रशिया आणि युक्रेनमधील तनावाचं वातावरण पाहता रशिया कधीही युक्रेनवर हल्ला करु शकतं. रशियाने युक्रेनला तीन बाजूंनी घेरले आहे. युद्धाचा धोका लक्षात घेता युक्रेनमधील भारतीय दुतवासानं भारतीय नागरिकांना काही खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना देश तात्पुरता सोडण्याचा सल्ला दुतवासानं दिला आहे. खूपच महत्त्वाचं काही काम असेल तरच युक्रेनमधे रहा, असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, इतर अनेक देशही लोकांना तेथे जाण्यास नकार देत आहेत आणि तेथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांना तेथून परतण्याचे आवाहन केलं जात असलेलं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

Gold Rate | सोन्याचा दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा आजचे ताजे दर

“किरीट सोमय्यांचे आरोप हे TV वर येणाऱ्या जाहिरातींसारखे”

“दादा आपण आत्ताच आपली पब्लिसिटी करु कारण 3 नंतर संजय राऊत सगळे चॅनल टेक ओव्हर करतील”

पत्रकार परिषदेआधी संजय राऊतांचा माध्यमांशी संवाद, म्हणाले…

“आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश, उद्या शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र बोलणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More