7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले

Russia | पंजाब आणि हरियाणातील तरुणांच्या एका गटाने भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्यांची फसवणूक झाली असून त्यांना रशिया-युक्रेन युद्धात ओढले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. रशिया-युक्रेन युद्ध लढण्यास भाग पाडले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली. या व्हिडीओमध्ये लष्कराचे कपडे घातलेली सात मुले बंद खोलीत दिसत आहेत. यातील हर्ष नावाचा मुलगा हरयाणातील कर्नाल येथील रहिवासी आहे.

एक तरूण सद्य स्थितीचे वर्णन करताना त्यांच्यासोबत नेमके काय घडले याबाबत सांगत आहे. NDTV या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व मुले 27 डिसेंबर रोजी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी रशियाला गेली होती. त्यांच्याकडे रशियाला जाण्यासाठी 90 दिवसांचा वैध व्हिसा होता. त्यानंतर एजंट त्यांना बेलारूसला घेऊन गेला. बेलारूसला जाण्यासाठी व्हिसा लागेल हे माहीत नव्हते, असे या मुलांचे म्हणणे आहे.

7 भारतीयांची फसवणूक

तसेच व्हिसाशिवाय ते बेलारूसला पोहोचताच एजंटने त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांना तिथेच सोडले. यानंतर पोलिसांनी त्यांना पकडून अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. हा व्हिडीओ बनवणाऱ्या हर्षने दावा केला की, त्याला काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी सांगण्यात आले. त्यावर काय लिहिले होते याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यानंतर रशिया त्यांना युक्रेनविरुद्ध युद्ध करण्यास भाग पाडत आहे.

हर्षच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांचा मुलगा रोजगाराच्या शोधात परदेशात गेला होता आणि रशियामार्गे गेल्यास त्याला त्याच्या आवडीच्या देशात राहणे सोपे जाईल असे त्याला सांगण्यात आले. हर्षची आई म्हणाली, आमचा मुलगा 23 डिसेंबर रोजी कामाच्या शोधात परदेशात गेला होता आणि त्याला रशियात पकडण्यात आले आणि त्याचा पासपोर्ट हिसकावून घेण्यात आला.

 

Russia फिरायला गेले अन्…

तसेच त्याने आम्हाला सांगितले की, त्याला रशियन सैनिकांनी पकडले होते, ज्यांनी त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची धमकी दिली आणि त्याला सैन्यात भरती केले. हर्षला लष्करी प्रशिक्षण घेणे भाग पडले. आता हर्षची आई आपल्या मुलाला सुखरूप परत आणण्यासाठी भारत सरकारकडे याचना करत आहे.

हर्षच्या भावाचा दावा आहे की, हर्षला लष्कराचे प्रशिक्षण देण्यात आले. तो जिवंत असेल की नाही, हे आता सांगणे कठीण आहे. भावाला देशात परत आणण्याचे आवाहनही मी सरकारला केले. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव गुरप्रीत सिंग असल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्या कुटुंबीयांनीही सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे.

News Title- 7 youths from Punjab-Haryana, who went for a walk in Russia, have been cheated and have been recruited into the war against Ukraine
महत्त्वाच्या बातम्या –

850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय

महायुतीचा राज्यातील जागावाटपाचा तिढा सुटला? अमित शाह यांची मुंबईत बैठक!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना मेल गेल्याने खळबळ

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान, नेत्यानं सांगितली अंदर की बात

घटस्फोटानंतर सानिया मिर्झा जगतेय ‘असं’ आयुष्य, पाहा फोटो