बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Russia-Ukraine War | ‘इतके’ हजार भारतीय अडकल्यानं चिंतेचं सावट

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनचा वाद वाढला असल्याचं पहायला मिळत आहे. दोघांमध्येही युद्ध होणार असल्याचं समोर येत होतं. अखेर रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाली असून याचे पडसाद संपूर्ण जगभरात पडत असल्याचं दिसत आहे. या युद्धाचा मोठा परिणाम भारतावरही होत आहे.

रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही रशियानं दिला आहे. अशातच टीव्हा माध्यमांवर या युद्धाचे फोटो आणि व्हिडीओ दाखवले जात आहेत. त्यामुळे नागरिक आणखी चिंतेत आहेत.

युक्रेनच्या आकाशात धूर आणि धुराचे लोट पाहून ज्या भारतीय कुटुंबांची मुले-मुली तिथे अडकली आहेत, ती घाबरली आहेत. युक्रेनमध्ये अजूनही 18,000 हून अधिक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भारतीयांना अजूनही युक्रेनमधे अडकलेल्या नातेवाईकांविषयी भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, एअर इंडियाच्या AI1947 या विमानाने मंगळवारी पहिल्यांदाच नवी दिल्ली ते कीवसाठी उड्डाण केले. 240 हून अधिक भारतीयांना धोकादायक परिस्थितीत घरी आणण्यात आले. युक्रेनमधून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी 72 तासांपूर्वी ऑपरेशन सुरू केले. पण हल्ला सुरू झाल्यानंतर ते थांबवावे लागले आहे.

थोडक्यात बातम्या – 

Gold Rate: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर, वाचा आजचे ताजे दर

“नवाब मलिकांनी बांग्लादेशातून मुली मुंबईत आणून वेश्याव्यवसाय केला…”

Apple ची बंपर ऑफर; iPhone 13 वर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फटका, होतील ‘हे’ गंभीर परिणाम

मोठी बातमी! पुतीनची युक्रेनवर सैन्य कारवाईची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More