रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर काय परिणाम?, वाचा सविस्तर
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडाला आहे. कच्च्या तेलाचे दर 104 डॉलर प्रति बॅरल या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत.
कच्च्या तेलाच्या दरात लक्षणीय वाढ झाली असताना भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर केले आहेत. अनेक राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाले आहेत. मात्र, मुंबई-दिल्लीसारख्या महानगरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.
मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक असून सध्या मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 110 रूपये मोजावे लागत आहेत. साधारण गेल्या 4 महिन्यांपासून मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकतासारख्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर क्रुड ऑईलचे दर सतत वाढत आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असताना निवडणुकीच्या दबावामुळे सरकारी तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू शकत नाहीयेत. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
“तर मी प्रत्येक रशियन सैनिकासोबत सेक्स करेन”
“काय गोंधळ घालायचाय ते घालू देत, नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही”
“आता मी आलोय, तुमच्या प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”
Corona : वनस्पतींपासून बनवण्यात आलेल्या ‘या’ लशीला सरकारची मान्यता
“संजय तू पुरावे देच, मी पण तुझ्या नेत्यांच्या कारनाम्याची लिस्ट ईडीकडे पाठवतो”
Comments are closed.