बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Russia-Ukraine War| रशियाचं युक्रेनियन सैन्याला अल्टिमेटम

नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होईल. या युद्धात युक्रेनचं (Ukraine) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना रशियाने (Russia) युक्रेनमधील मुख्य शहरांवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत.

रशियाकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र, अशा परिस्थितही युक्रेन मागे हटायला तयार नाही. युक्रेन संपूर्ण ताकदीने रशियाला तोंड देत असताना रशियाकडून मारियुपोल शहरातील युक्रेनियन सैनिकांना अल्टिमेटम देण्यात आलं आहे.

युक्रेनच्या सैनिकांना आपला जीव वाचवायचा असेल तर त्यांनी शरणागती पत्करावी, असा इशारा रशियाकडून देण्यात आला आहे. जो युक्रेनियन नागरिक शस्त्र ठेवेल त्याचा जीव वाचवला जाईल, अशी हमी रशियन सैन्याच्या वतीने देण्यात येत आहे.

दरम्यान, आम्ही युक्रेनियन सैन्याला स्वेच्छेने निर्णय घेण्यासाठी आणि शस्त्रे ठेवण्यासाठी अल्टिमेटम देत असल्याचं रशियन संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात स्पष्ट केलं आहे. तर आतापर्यंत रशियाचे 169 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

थोडक्यात बातम्या-

राणू मोंडल झळकणार ‘या’ सुपरस्टारसोबत, नवीन गाणं सोशल मीडियावर व्हायरल

“भाजपला पाच हजार वर्षांचा हिंदुत्त्वाचा इतिहास आहे”

‘ते’ वक्तव्य संजय राऊतांच्या अंगलट येणार?, न्यायालयात याचिका दाखल

“मंत्री धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग”

धनंजय मुंडेंकडून राज ठाकरेंचा अर्धवटराव म्हणून उल्लेख, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More