रशिया-युक्रेन युद्धामुळे भारत-अमेरिकेचं बिनसलं?; बायडन यांची नाव ने घेता भारतावर टीका
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचे पडसाद भारतावरही पाहायला मिळत आहेत. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
युक्रेनच्या मुद्द्यावरून भारताला जाहीरपणे रशियापासून दूर ठेवण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी क्वाड देशांची एक आपत्कालिन बैठक बोलावली होती. तर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यातच युक्रेनच्या मुद्द्याचा क्वाड अजेंडामध्ये समावेश करायला नकार दिला होता.
भारत आणि युएई या दोन्ही देशांनी युक्रेनच्या मुद्द्यावर तटस्थ भूमिका घेतली आहे. ही तटस्थ भूमिका या देशांना रशियाच्या बाजूने उभी करत असल्याचं बायडन प्रशासनाचं मत आहे. त्यात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने राजनैतिक वापरासाठी वापरण्यात आलेली केबल भारताकडून परत घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्र महासभेच्या मतदानाने पुतीनचे जगापासून वेगळेपण उघड केले आणि जग रशियाचं खोटं नाकारत आहे, असं जो बायडन यांनी भारताचा उल्लेख न करता एका निवेदनात म्हटलं होतं. तर अयोग्य भाषा आणि चुकीच्या कारणामुळे जारी केली म्हणत अमेरिकेने भारताकडून केबल परत घेतली आहे.
थोडक्यात बातम्या-
रशियाने भारतासाठी सहा तास युद्ध थांबवलं?, परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
कोरोना कायमचा संपला नाही, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
भाजपवर टीका करत एकनाथ खडसेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर, म्हणाले…
“…तर ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही”
नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला; वाचा न्यायालयात नेमकं काय घडलं?
Comments are closed.