Russia Ukraine War | रशियन सैनिकांविषयी ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
नवी दिल्ली | रशिया युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. या युद्धामुळे अनेकांचे मोठं नुकसान झालं आहे. अद्यापही युद्ध सुरु असून आज युद्धाचा 25 वा दिवस आहे. अजूनही दोन्ही देशांत गंभीर परिस्थिती असल्याचं दिसत आहे.
रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केला. व्लादिमीर पुतिन यांना वाटले की काही दिवसांत त्यांचे सैन्य युक्रेनवर ताबा मिळवेल, पण असं काही झालं नाही. रशियाच्या हल्ल्याला युक्रेन कनखरपणे सामोरं गेलं. यामुळे, रशियन सैनिक आता त्रस्त झाले आहेत आणि मायदेशी परतण्याची संधी शोधत आहेत.
रशियन सैनिक आता स्वतःला इजा करत आहेत. स्वतःवर गोळ्या झाडून घेत आहे. त्याचबरोबर युक्रेन सैनिकांनाही त्यांनी दारुगोळे पुरवायला त्यांची मदत करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या युद्धभूमीवर सैनिकांमध्ये चिंतेचा विषय आहे.
दरम्यान, गेल्या 24 दिवसांपासून रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्ले, हवाईहल्ले तसेच क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. या हल्ल्यांत युक्रेनमध्ये मोठी जीवीत तसेच वित्तहानी झालेली आहे. या दोन्ही देशांतील युद्ध थांबावं अशी प्रार्थना सध्या सगळेजन करत आहेत.
थोडक्यात बातम्या –
“माझा नंबर पहिला येतो, पण काही लोक….”; फडणवीसांचा घणाघात
उन्हाच्या तडाख्यानंतर ‘या’ भागात पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा
‘…अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार’; दानवेंच्या नव्या दाव्यानं खळबळ
Corona Update: कोरोनाविषयी WHO चा पुन्हा गंभीर इशारा, म्हणाले…
एमआयएमसोबत युती करणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
Comments are closed.