बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाची शेवटची खेळी?, धक्कादायक माहिती समोर

कीव | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असताना रशिया (Russia) व युक्रेनमधील (Ukraine) लष्करी संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. युक्रेनमधील परिस्थिती भयावह असताना रशिया युक्रेनवर शेवटच्या टप्प्यातील हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.

रशियन सैन्य सध्या त्यांच्या युक्रेनवरील शेवटच्या टार्गेटवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. युक्रेनमधील महत्त्वाचं बंदर असलेल्या मारियुपोल (Mariupol) शहरातील स्टील प्लांटवर रशियन सैनिकांनी हल्ला केला आहे. रशियाने अझोवस्टल भाग वगळता संपूर्ण मारियुपोल शहरावर ताबा मिळवला आहे.

युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार तब्बल 2000 सैनिक या स्टील प्लांटमध्ये आहेत. तर 1000 सैनिक हे प्लांटच्या भूमिगत बोगद्यांमध्ये आश्रय घेत आहेत. त्यामुळे या प्लांटवर हल्ला न करता त्याऐवजी त्यांचे बाह्य संपर्क तोडण्याचे आदेश रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियन सैन्याला दिले आहेत.

दरम्यान, 24 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. युक्रेनमधील अनेक महत्त्वाची शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केले असताना रशियाचंही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“…तर जशास तसं उत्तर देण्याची धमक आमच्यातही आहे”

‘आय रिपीट…’, संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा

“उद्धव ठाकरे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”; राणांचे धारदार बाण चालूच

“मुख्यमंत्र्यांवर कितीही हल्ले झाले तरी ठाकरेंचा संयम ढळला नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More