नवी दिल्ली | गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेममध्ये तणावाचं वातावरण पहायला मिळत होतं. अखेर हे तणावाचं सावट युद्धात बदललं आहे. त्यामुळे जगभरात याचे पडसाद दिसून येत आहे. अशातच रशिया आणि युक्रेममध्ये युद्धाचं नेमकं कारण काय? याविषयी जाणून घेऊया.
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचं नेमकं कारण म्हणजे नाटो. नाटो (NATO) म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नाटो ही एक लष्करी संघटना असून 1949 मध्ये बारा देशांनी या संघटनेची स्थापना केली होती. कोणत्याही एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास इतर जण मदतीला येतील, असा उद्देशानं नाटोची स्थापना झाली.
युक्रेननं नाटोमध्ये जाण्यासाठी पावलं उचलायला सुरूवात केल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष वाढत गेला. युक्रेन हा नाटोचा सदस्य देश नाहीये. पण तो ‘भागीदार देश’ आहे. म्हणजेच भविष्यात केव्हाही या देशाला नाटोचं सदस्य होता येणार. रशियाला याच गोष्टीचा आक्षेप आहे.
युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटो देशांचे सैन्य आणि तळ त्याच्या सीमेजवळ येतील, असं रशियाला वाटत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना असं वाटतं की, पाश्चिमात्य देश हे रशियाला घेरण्याच्या उद्देशाने या देशांशी संबंध जोडत आहेत. त्यामुळे युक्रेन आणि रशियातील वाद आणखीनच चिघळला आहे.
थोडक्यात बातम्या –
Russia-Ukraine War | ‘इतके’ हजार भारतीय अडकल्यानं चिंतेचं सावट
रशियाकडून युक्रेन विमानतळावर बॉम्बफेक, लाईव्ह व्हिडीओ आला समोर
Gold Rate: रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर, वाचा आजचे ताजे दर
“नवाब मलिकांनी बांग्लादेशातून मुली मुंबईत आणून वेश्याव्यवसाय केला…”
Apple ची बंपर ऑफर; iPhone 13 वर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट
Comments are closed.