युक्रेनमधील सायकलस्वारावर पडला रशियाचा बॉम्ब, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर
कीव | युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश दिले. पुतीन यांच्या घोषणेने सुरू झालेल्या रशिया-युक्रेन वादाचा सर्वात जास्त फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
युक्रेनची राजधानी असलेल्या कीवसह अनेक भागात रशियाने बॉम्ब हल्ले घडवून आणले. बॉम्ब हल्ल्याचा एक थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यूक्रेनच्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका सायकलस्वारावरच अचानक हवेतून बॉम्ब हल्ला झाला.
या व्हिडीओमध्ये यूक्रेनच्या रस्त्यावरून जात असलेल्या सायकलस्वारावर अचानक बॉम्ब हल्ला झाला. बघता बघता काही सेकंदातच सगळीकडे आगीच्या ज्वाळा भडकताना दिसत आहेत. रशियाचा हा क्रुर हल्ला सर्वसामान्यांच्या जीवावर बेतत आहे.
दरम्यान, रशियाने गुरूवारी युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात 137 लोकांचा मृत्यू झाला असून 300 पेक्षाही अधिक लोक जखमी झाले आहेत. यूक्रेनमधील अनेक शहरात स्फोटाच्या आवाजाने हाहाकार माजलेला असताना युक्रेनवरील हल्ले आजही सुरूच आहेत.
The moment when civilians were shot in Ukraine. pic.twitter.com/VfrjtE3lCX
— REALIST (@realistqx1) February 24, 2022
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! नवाब मलिकांनंतर शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई
‘ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी खुशाल जा पण नंतर…’, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी
Russia-Ukraine War | युक्रेनियन सैनिकाचा ‘तो’ भावूक व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
रशियाच्या आक्रमणाला तोंड देणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष स्वत: रणांगणात
‘त्यादिवशी अनेकांना तोंड दाखवण्याचीही जागा उरणार नाही’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.