बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुतिन यांची मोठी घोषणा, रशिया-युक्रेन युद्धाबाबत महत्त्वाची माहिती समोर

कीव | रशिया-युक्रेन युद्धाचा आज 131 वा दिवस आहे. एक एक करुन रशिया युक्रेनचे प्रांत जिंकत आहे तर दुसरीकडे युक्रेन त्यांना तगडी लढत देत रशियाने आपले जिंकलेले प्रांत परत मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. त्यात आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन मोठी घोषणा केली आहे.

व्लादिमीर पुतिन यांनी रशियाने पूर्व युक्रेनमधील लुहांस्क प्रांत जिंकल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पश्चिम देशांकडून मिळालेल्या हत्यारांमुळे आम्ही रशियाने आमच्य़ा बळकावलेल्या प्रांतापैकी एक एक तुकडा परत मिळवू असे सांगितले आहे. सुरुवातीच्या काळात युक्रेनवर विजय मिळविणे रशियासाठी फार सोप्पे असल्याचे बोलले जात होते. नाटोनेसुद्धा तसेच सांगितले होते. परंतु आता सहा महिने उलटुनही युक्रेन हार मानायला तयार नाही.

सुरुवातीच्या काळात रशियाचे सैनिक युक्रेनच्या राजधानी कीवपर्यंत पोहोचले होते. परंतु रशियाला अजून हवी तशी सफलता मिळाली नाही. रशियन सैन्य सतत हल्ले करुन छोटी – मोठी शहरे काबिज करत आहेत. शहरांच्या नुकसानामुळे युक्रेनला मागे हटावे लागत आहे. युक्रेनचे गव्हर्नर सेरेही गैदाई यांनी अजून आम्ही युद्ध हरलो नाही, असे सांगितले आहे.

दरम्यान, आम्ही कोणत्याही परिस्थितीत हत्यारे टाकणार नाही. असे केल्याने जगातून आमचे अस्तित्व संपुन जाईल. आम्ही युक्रेनी लोक असे कधी होऊ देणार नाही. काळ्या महासागरात युक्रेनचा झेंडा आम्ही लढत असल्याची साक्ष देतो आहे. आम्ही लढत रहाणार, असं युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की रशियाच्या लुहांस्कवर कब्जावर बोलताना म्हणाले,

थोडक्यात बातम्या –

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

शिंदे गटाचा शिवसेना आमदारांना झटका, आदित्य ठाकरेंना मात्र मोठा दिलासा

पैसे द्या अन् पदवी घ्या! पदव्या विकण्याचा गोरखधंदा जोमात

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

‘आम्हाला डुकरं म्हणतात आणि आमच्याच मतांवर राज्यसभेत निवडून जातात’,गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More