बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जो बायडन यांच्या वक्तव्यावर रशियाची नाराजी, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मॉस्को | रशिया-युक्रेन युद्ध(Russia-Ukraine War) सुरू होऊन 26 दिवस उलटली आहेत. युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाने युक्रेनमधील मुख्य शहरांवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. रशियाकडून (Russia) सातत्याने होणाऱ्या हल्ल्यात युक्रेनमधील (Ukraine) शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर युक्रेन सैनिकांसह शेकडो नागरिकांनीही त्यांचा जीव गमावला.

युद्धादरम्यान अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादलेले पाहायला मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) रशियावर टीका करताना दिसत आहेत. जो बायडन यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे रशियाने मोठं पाऊल उचललं आहे.

जो बायडन यांनी केलेल्या वक्तव्याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या राजदूताला बोलावून घेतलं आहे. जो बायडन यांच्यामुळे रशिया व अमेरिकेतील संबंध तुटण्याच्या मार्गावर असल्याचं रशियाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, युक्रेनच्या शहरांवर भयानक हल्ले करण्यात चीनने रशियाला मदत करण्याचं ठरवलं तर त्याचे परिणाम चीनला भोगावे लागतील, असा इशारा जो बायडन यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना दिला होता. तर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन (Vladimir Putin) यांच्यासोबत चर्चा झाल्यावर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी चर्चा अपयशी ठरली तरी तिसरे महायुद्ध होऊ शकते, असा इशाराही दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू

Russia Ukraine War: …म्हणून रशिया-युक्रेन युद्धात हस्तक्षेप करण्यास नाटोने दिला नकार

Cyclone Alert: पुढील 12 तास महत्त्वाचे, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

Sharmila Thackeray: शर्मिला ठाकरेंची शिवसेनेवर घणाघाती टीका, म्हणाल्या…

सर्वसामान्यांना मोठा झटका, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ ?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More