नवी दिल्ली | दोन महिने उलटून गेले अद्यापही रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरुच आहे. या युद्धानं सगळ्याच देशांची चिंता वाढवली आहे. याचा परिणामही आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून आला. हे युद्ध कधी समाप्त होणार याकडे सध्या सगळ्यांच्या नजरा लागून आहे.
रशिया युक्रेनच्या युद्दानं तणावपूर्ण स्थिती निर्माण केली आहे. अशातच आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रशियानं जपानवर मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. रशियानं जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (PM Fumio Kishida) यांच्यासह देशातील 63 अधिकाऱ्यांवर बंदी घातली आहे.
या लोकांच्या प्रवेशावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. हे लोक मॉस्कोविरुद्ध खोटी वक्तव्य करतात, त्यामुळेच जपानविरोधात अशी भूमिका घेण्यात आली आहे, असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे.
दरम्यान, जपानवर घातलेल्या बंदीविषयी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं आज घोषणा केली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वातावरण चिघळत चालल्याचं दिसत आहे.
थोडक्यात बातम्या –
“सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सिडीज बेबी….”; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
“भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी केला”
“मला दंगल भडकवायची असती तर….”; राज ठाकरे स्पष्टच बोलले…
“उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी…”; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
नवनीत राणा आणि रवी राणांना जामीन मंजूर, मात्र…
Comments are closed.