बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रशियाचं बेपत्ता विमान समुद्रात कोसळलं, 28 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | रशियातून काल बेपत्ता झालेल्या विमानाचा आज शोध लागला आहे. हे विमान डोंगराच्या टोकाला घासून समुद्रात कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला असून यात 22 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सचा समावेश आहे.

रशियातील पूर्वेकडील भागात कामचटका द्वीपकल्पात सुमारे 28 लोक घेऊन जाणाऱ्या रशियन विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी या विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने देण्यात आली होती. मात्र मंगळवारी उशिरा या विमानाचा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.

विमानात 22 प्रवासी होते. ज्यामध्ये एका मुलासह 6 क्रू मेंबर्स आहेत. विमान लँडिंगसाठी तयार होत असतानाच त्याचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. हे विमान कामचटका एव्हिएशन एंटरप्राइझचे आहे. हे विमान रशियातील कामचाट्का प्रायद्वीपमधील पालना गावात उतरणार होते. मात्र ओखोतस्कच्या समुद्रात हे विमान कोसळलं.

दरम्यान, विमान शोधण्यासाठी दोन हेलिकॉप्टर, एक विमान तैनात करण्यात आले होते. पालना शहरापासून 10 किलोमीटर दूर असताना विमानाचे मोठ्या डोंगराला घर्षण झालं आणि विमान समुद्रात कोसळलं. रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिनने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“…मग ईडीने देवेंद्र फडणवीसांची चौकशी का करु नये?”

कोरोनामुक्त झालेल्या महिलेला उद्भवली ही समस्या; डॉक्टरही झाले हैराण

“तुमची गाडी पेट्रोल, डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं”

‘भास्कर जाधव यांनीच आईवरुन शिवी दिली’; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

“काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More