रशियाचा पुन्हा आक्रमक पवित्रा; पुतिन यांचा ‘या’ देशाला गंभीर इशारा
मुंबई | रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर युक्रेनमधील अनेक शहरांना युद्धभूमीचे स्वरूप आले आहे. तेथील भीषण दृष्ये समोर येत असून नागिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दोन महिन्यांसापासून युद्ध सुरु असून याचे संपूर्ण जगावर पडसाद उमटले आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
फिनलँडच्या नाटोमधील समावेशाच्या घोषणेवर रशियानं चांगलाच संताप व्यक्त केला आहे. रशियानं फिनलँडला परिणाम भोगायला तयार राहा अशी धमकीच दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रशियाचा आक्रमक पवित्रा पहायला मिळत आहे.
फिनलँडनं नाटो देशांचं सदस्यत्व घेतलं तर याचे रशिया-फिनलँडसोबतच्या संबंधांवर परिणाम तर होतीलच पण उत्तर युरोपमध्येही स्थिरता आणि सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण होईल. यामुळे मोठं नुकसानाचाही सामना करावा लागेल.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना फिनलँडनंही नाटो देशांमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. यावरुन आता पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
राज्यात ‘या’ भागात तीव्र उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा इशारा
मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाचा दिलासा
पुणे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बॉम्बसदृश वस्तूबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
“…तर तुम्हाला देखील याच कबरीत जावं लागेल”
‘पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला नाही औरंगजेबाकडे पाठवलं तर…’; नितेश राणे कडाडले
Comments are closed.