बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्थिक कोंडी फोडण्यासाठी रशियाने भारताला दिली ‘ही’ खास ऑफर

नवी दिल्ली | रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश देत युक्रेन विरोधात युद्ध सुरू केलं. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. रशियाकडून (Russia) युक्रेनवर (Ukraine) सातत्याने होणाऱ्या तीव्र हल्ल्यामुंळे अमेरिकेसह अनेक युरोपीयन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले.

अमेरिका आणि युरोपीयन देशांकडून होणारी आर्थिक कोंडी फोडण्यासाठी रशियाने भारताला खास ऑफर दिली आहे. भारत आणि रशियामधील व्यापाराच्यादृष्टीने रशियाने भारतासमोर मोठा प्रस्ताव ठेवला आहे. रशियाने भारताला रूपये-रूबल डिनोमिनेटेड पेमेंटचा पर्याय दिला असून भारताने त्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

रशियन चलन रूबल भारतीय बँकेत जमा केले जातील. त्याचे चलन विनिमय होऊन रूपयात बदल होतील आणि अशाच प्रकारे रूपये आणि रूबलमध्ये चलन विनीमय होतील, असा प्रस्ताव रशियाकडून देण्यात आला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव दोन दिवसाच्या भारतीय दौऱ्यावर आहेत. यावेळी या प्रस्तावाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करायचे आहे. त्यामुळे भारतालाही रशियासोबत द्विपक्षीय व्यवहार सुरू ठेवायचा आहे. तर रशियाही अमेरिकेकडून झालेली आर्थिक कोंडी फोडण्याच्या प्रयत्नात आहे.

थोडक्यात बातम्या-

“…पण आम्ही देश वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू”

“भविष्यात नाना पटोलेंवरही धाडी पडल्यातरी मला आश्चर्य वाटणार नाही”

भाजप नेत्यांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड

झेलेन्स्कींना सतावतेय ‘ही’ भीती, अधिकाऱ्यांना दिले काहीही न खाण्या पिण्याचे आदेश

“एकनाथ शिंदे हुशार व्यक्ती, त्यांनाच मुख्यमंत्री करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More