बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! युक्रेनवरील आण्विक हल्ल्याबद्दल रशियाचं मोठं वक्तव्य

मॉस्को | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. युद्ध संपवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मंगळवारी इस्तंबुलमध्ये दोन्ही देशातील प्रतिनीधींची प्रत्यक्ष बैठक झाली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असली तरी रशियाने आण्विक हल्ल्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

जर नाटो (NATO) देशांनी युक्रेनला विमान आणि आण्विक हवाई रक्षा साधनांचा पुरवठा केला तर रशियाकडूनही त्याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असा इशारा रशियाकडून देण्यात आला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ता दमित्री पेस्कोव यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना युक्रेनवरील आण्विक हल्ल्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

रशिया युक्रेनवर आण्विक हल्ल्याचा वापर करणार नाही. मात्र, रशियाच्या अस्तित्वाला काही धोका असल्याचं जाणवलं तर आण्विक हल्ला करण्यात येईल, असं मोठं वक्तव्य दमित्री यांनी केलं आहे. तर रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेन व नाटो देशांना थेट इशारा दिला असल्याचं देखील म्हटलं जात आहे.

दरम्यान, या दोन देशांमध्ये झालेल्या बैठकीत युक्रेनची राजधानी कीव व चेर्निहिन येथील लष्करी कारवाया कमी करण्याचं आश्वासन रशियाने दिलं आहे. तर युक्रेननेही आंतरराष्ट्रीय हमीसह तटस्थता ऑफर स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, एक महिन्यात युक्रेनच्या सैन्यात मोठी घट झाल्याने रशिया युक्रेवर हल्ल्याचा दुसरा टप्पा सुरू करण्याची देखील शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

राजकीय वर्तुळात खळबळ! संजय राऊत आणि ‘या’ भाजप खासदारामध्ये 3 तास बैठक

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

“… पण मला वाटतंय आशिष शेलारांच्याच मेंदूला लकवा आलाय”

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, मुंबईत डिझेलचीही शंभरी पार; वाचा ताजे दर

“अजित पवारांचा घोटाळा सिद्ध झालाय, माझी भारत सरकारला विनंती आहे की…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More