बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली??? ;रशियाने तालिबान्यांना दिला ‘हा’ गंभीर इशारा

मॉस्को | अफगाणिस्तानच्या भूभागावर गेल्या महिन्याभरापासून तालिबान्यांनी बंदुकीच्या जोरावर कब्जा केला आहे. तालिबान्यांनी पंजशीरवर सुद्धा हल्ला करून ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आता इसीसचा अफगाणिस्तानवर डोळा असल्यानं रशियाने अफगाणिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. तर रशिया अफगाणिस्तानात पुन्हा आपलं सैनिकी कारवाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली होत असल्याचं दिसून येतंय.

अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या भीतीमुळे ताजिकिस्तानातील सैन्य तळांवर सुसज्ज रणगाडे पाठवण्याची घोषणा रशियाने केली आहे. तसेच मध्य आशियातील बहुतांश देश तालिबान्यांच्या दहशतीमुळे भीतीच्या छायेखाली आहेत. अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी सत्ता आल्यानं पुन्हा दहशतवादी हल्ले वाढण्याची शक्यता असल्याचं रशियाने सांगितलं आहे.

रशियाच्या सेक्युरिटी कांऊन्सिलचे डेप्यूटी चेअरमन दमित्री मेदवेदेव यांनी एक लेख लिहताना म्हटलं आहे की, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार मध्य आशियाई देशांच्या लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर 10 हजार पेक्षा जास्त दहशतवाद्यांसह त्यांचा पाठलाग करणारे लोक ठाण मांडून बसले आहेत. इसीसला या अन्य देशांमध्ये वर्चस्व मिळवायचं आहे.

दरम्यान, तालिबानच्या भीतीमुळे ताजिकिस्तान या देशाने त्यांच्या 1344 किमी लांब सीमेवर हजारो सैन्य तैनात केलं आहे. ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातली सीमा ही जास्त प्रमाणात डोंगराळ भागाची आहे. त्यामुळं ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमली रहमोन यांनी जास्त सतर्क रहा आणि कठोर कारवाई करा, असे आदेश सैन्यांना दिले आहेत.

थोडक्यात बातम्या –

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

‘शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं’; बाळासाहेब थोरातांचं पवारांना आवाहन

राजस्थानची चिंता मिटली! आयपीएलआधी ‘या’ नव्या खेळाडूची तुफान खेळी

‘महिलांच्याबाबतीत सरकार असंवेदनशील’; राष्ट्रीय महिला आयोगाने ठाकरे सरकारला फटकारलं

‘तिचीच चूक असणार’; हेमांगी कवीची मन हेलावून टाकणारी पोस्ट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More