नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन आता जवळपास 50 दिवसांचा कालावधी उलटला आहे. रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाईचे आदेश दिल्यानंतर अमेरिकेसह (USA) पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले.
रशिया (Russia) विरूद्धच्या युद्धात अमेरिकेने वेळोवेळी युक्रेनला (Ukraine) मदत केल्याचं समोर आलं आहे. युक्रेनसाठी अमेरिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिका युक्रेनला अतिरिक्त मदत करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी केली आहे.
अमेरिकन प्रशासन युक्रेनला अतिरिक्त 800 मिलियन डॉलर्सची मदत करणार असल्याचं जो बायडन यांनी बुधवारी सांगितलं. यामध्ये लष्करी मदतीचा समावेश असून अमेरिका युक्रेनला अवजड शस्त्रे आणि उपकरणे देणार आहे. 155MM च्या 18 हॉवित्झर तोफ, 40 हजार गोळ्या, 2 हवाई पाळत ठेवणारे रडार, 300 स्विचब्लेड आर्मर्ड ड्रोन, 500 अँटी आर्मर्ड क्षेपणास्त्रे आणि 3000 हेल्मेटचा सेट अमेरिका युक्रेनला देणार आहे.
दरम्यान, युक्रेनला रशियाकडून होणाऱ्या मोठ्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी अमेरिका ही अतिरिक्त मदत देत आहे. तर अमेरिकेने अतिरिक्त हेलिकॉप्टरचा पुरवठा करायला देखील मान्यता दिली असल्याचं जो बायडन यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
वकील गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार
रणबीरच्या आधी ‘या’ अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं आलियाचं नाव
रेल्वेचा प्रवाशांना दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘मंजुलिका’ पुन्हा परतली….; ‘भूल भुलैंया 2’ चा धमाकेदार टीझर रिलीज
चक्क 1 रूपयांत मिळणार 1 लीटर पेट्रोल, जाणून घ्या कुठे मिळतीये ऑफर
Comments are closed.