सोलापूर | कर्तुत्व असं की वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी गावच्या प्रस्थापितांना पराभवाची धूळ चारत त्यानं गावच्या निवडणुकीत स्वतःचे पॅनल निवडून आणले, आता त्याला नशिबानंही साथ दिली असून सर्वात कमी वयाचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर सर्वांचं लक्ष लागलं होतं सरपंचपदाच्या सोडतीकडे, सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावचं सरपंचपद सर्वसाधारण पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झालं आहे.
सरपंचपदाचं आरक्षण सर्वसाधारण पुरुष उमेदवाराला आरक्षित झाल्यानं ऋतुराज देशमुखचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला असून वयाच्या अवघ्या २१ वर्षे ३ महिने वयाचा तो सर्वात तरुण सरपंच ठरेल.
ऋतुराजनं गावच्या विकासाचं व्हिजन मांडलं होतं, त्यानं तसा जाहीरनामाच प्रसिद्ध केला होता, जो लोकांना चांगलाच भावला आणि त्याच्या पॅनल्सना घवघवित यश मिळालं. सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर ‘थोडक्यात’शी बोलताना त्याने आपल्यावर विश्वास दाखवलेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. आपल्या सर्वांना अभिमान वाटेल, असं काम करुन दाखवेन, असं ऋतुराजनं म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
आशिष शेलार भाजप आणि संघाचे गुलाम- अमोल मिटकरी
“शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?”
आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीचा प्रचार, पाटील आता काँग्रेसमध्ये दाखल!
भारतातील ‘या’ शहरात पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार
“बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम”