सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावची निवडणूक ऋतुराज रवींद्र देशमुख या 21 वर्षांच्या तरुणाने जिंकली आहे. ऋतुराजनं 38 मतांनी विरोधी उमेदवारावर वियज मिळवला आहे. इतकंच नाही तर त्यानं निवडणुकीसाठी स्वत:चं पॅनेल उभं केलं आणि तेसुद्धा जिंकून आणलं.
अगदी तालुक्यापर्यंत मला हरवण्यासाठी प्रयत्न झाले, पण मी सगळ्यांना पुरून उरलो, अशी प्रतिक्रिया ऋतुराजने बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.
आम्हा तरुणांना राजकारणापेक्षा गावच्या विकासात जास्त इंटरेस्ट आहे. जुन्या मंडळींना खुर्ची धरून ठेवण्यात रस जास्त आहे. आमचं तसं नाही, असं ऋतुराजने सांगितलं आहे.
ग्रामीण भागात उच्चशिक्षणासाठी शहरात गेलेली मुलं फारशी गावाकडे फिरकत नाहीत. ऋतुराज याला अपवाद ठरले. त्यांनी BSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि पुण्यात LLB साठी प्रवेश घेण्यास ते उत्सुक आहे.
थोडक्यात बातम्या-
“भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही”
आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या- अजित पवार
किमान आतातरी शिवसेनेनं आपली इज्जत आपणच राखावी- देवेंद्र फडणवीस
सेना-भाजपला समान जागा, अपक्षाच्या हाती ग्रामपंचायतीची सत्ता
मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे- उद्धव ठाकरे