बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जिगरबाज! दोन चेंडूवर मिळाली स्ट्राईक, तरीही पठ्ठ्याने गगनचुंबी षटकार ठोकत केलं शतक, पाहा व्हिडीओ

मुंबई | राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. यामध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला मोठं लक्ष्य दिलं आहे. चेन्नईकडून महाराष्ट्राचा मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडने शतक केलं आहे. ऋतुराज पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकातील सहाव्या चेंडूपर्यंत मैदानावर उपस्थित होता.

ऋतुराजने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी केली. शेवटच्या षटकावेळी जडेजा स्ट्राईवर होता आणि ऋतुराज नॉन स्ट्राईकला होता त्यावेळी तो वैयक्तिक 95 धावांवर खेळत होता. मात्र जडेजाने पहिले चार चेंडू खेळले त्यामुळे ऋतुराजचं शतक होणार नाही असं वाटतं होतं. पाचव्या चेंडूला त्याला स्ट्राईक मिळाली आणि पाचवा चेंडूवर त्याने एकही धाव काढली नाही त्यानंतर ऋतुराजने सहाव्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला.

षटकार ठोकत आयपीएलमधील आपलं पहिलं शतक पुर्ण केलं. या धमाकेदार खेळीमध्ये त्याने 60 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. यामध्ये 9 चौकार आणि 5 षटकांराचा समावेश होता.

दरम्यान, चेन्नईच्या संघाने शेवटच्या 5 षटकांमध्ये 73 धाव केल्या. ऋतुराजसोबत सर जडेजानेही रॉयल्सच्या गोलांदाजांचा समाचार घेतला. जडेजाने अवघ्या 15 चेंडूंमध्ये 32 धावांची छोटेखानी खेळी केली यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.

 

थोडक्यात बातम्या- 

रसिकांना खळखळून हसायला भाग पाडणारे लेखक द. मा. मिरासदार काळाच्या पडद्याआड!

ऐकावं ते नवलच! पोपटाची विद्यार्थ्यासोबत मैत्री, सोशल मीडियावर अनोख्या मैत्रीची तुफान चर्चा

‘तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो…’; ऑडिओ क्लिपबाबत रामदाम कदम यांची पहिली प्रतिक्रिया!

‘या’ चार गोष्टी असतील तरच देशाचा विकास होऊ शकतो- नितीन गडकरी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More