बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं होतं हे सर्वांना माहिती”

कोल्हापूर | कोल्हापूर पोटनिवडणुकीची रणधुमाळी पाहायाला मिळत असताना कोल्हापूरात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांच्या प्रचारार्थ बोलताना ऋतुराज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली. चार राज्यातील जनता वेगळी आणि कोल्हापूरची जनता वेगळ्या विचारांची आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावं, असा टोला ऋतुराज पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला पण भाजपनं (BJP) ही निवडणूक लावली. कोरोनाच्या संकटात कोल्हापुरात कोण होतं आणि पुण्याला कोण पळून गेलं हे सर्वांना माहिती, असा टोला ऋतुराज पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

दरम्यान, भाजपचे नेते वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करत आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका देखील ऋतुराज पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

तेल कंपन्यांचा सर्वसामान्यांना झटका, 13 दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

“मी तुमच्या बायकोवर बोलत नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?”

मनसेला मोठा धक्का! मुस्लिम कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

78 वर्षांच्या आज्जीने सर्व संपत्ती राहुल गांधींना केली दान, जाणून घ्या कारण

“हे सरकार इतकं नालायक निघालं की, वेश्यांना…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More