बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘एका पार्टीला मी 2 लाख खर्च करतो, तर 10 लाखांसाठी…’; फिक्सिंगच्या आरोपावर श्रीसंतने सोडलं मौन!

मुंबई | आयपीएल 2013 साली मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचा गोलंदाज एस. श्रीसंतला शिक्षा भोगावी लागली होती. आता गेल्या काही दिवसांमागे त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. अशातच फिक्सिंगबाबत श्रीसंतने स्पोर्ट्स क्रीडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये धक्कादायक दावे केले आहेत. यावेळी बोलताना त्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावला आहे.

एका पार्टीला मी 2 लाख खर्च करतो, तर 10 लाखांसाठी मी असं काम का करेल?, असं म्हणत श्रीसंतने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यासोबतच मी या सर्व प्रकरणामधून बाहेर पडण्यासाठी माझ्यामागे  उभे राहिलेल्या आणि माझ्यासाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचे मनापासून आभार, असं श्रीसंतने म्हटलं आहे.

सामन्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज होती त्यावेळी मी पहिल्या चार चेंडूंवर मी फक्त 5 धावा दिल्या होत्या त्यामध्ये एकही नो-बॉल, वाईड बॉल टाकला नव्हता. एवढंच नाही तर माझ्या पायावर 12 सर्जरी झालेल्या असूनही मी पाचही बॉल 130 किमी प्रतितासाने टाकले होते. मी त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी तयारी करत होतो त्या दौऱ्यामध्ये माझी निवड होणं माझं ध्येय असल्याचं श्रीसंत म्हणाला.

दरम्यान, मी मैदानात परतलो असलो तरी या घटनेमुळे मी नैराश्यात होतो. माझ्या वैयक्तिक आयुष्याचं मोठं नुकसान झालं.  या घटनेमुळे माझं आणि माझ्या कुटुंबाचं मोठं नुकसान झाल्याचं श्रीसंतने सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

#Breaking पंजाब काँग्रेसला मोठा धक्का! नवज्योतसिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मराठवाड्यात पावसाचं थैमान! 35 जणांचा मृत्यू तर 20 लाख हेक्टर शेतीचं नुकसान

“मुश्रीफांना तुरूंगात धाडणार, आजपासून ठाकरे सरकारच्या अंताला सुरूवात”

धक्कादायक! 2021च्या सुरुवातीला लस घेतली त्यांना कोरोनाचा धोका अधिक

युती नाही पण समझोता! आगामी निवडणुकांसाठी भाजप-मनसेचं गणित ठरलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More