S.T Strike| एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचं पुन्हा आवाहन, म्हणाले…
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा(ST workers) संप सुरू आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोवर संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार( Minister Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब( Minister Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अनेकवेळा आवाहन केलं आहे. त्यातच आता अजित पवारांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना अनेकवेळा सांगितलं आहे की, तुम्हाला चांगला पगार देण्याचा आपण प्रयत्न करू. आमच्या मुलाबाळांना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यांना गिरणी कामगारांचे मी उदाहरण मी दिलं आहे. त्यांचा पगार वेळेत मिळेल याची जबाबदारी घेतलेली आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
कोणी जर काही सांगत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. कोणी वेगळ्या प्रवाहात जात असेल त्यांना मुख्य प्रवाहात आणूया. असं अजित पवारांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या नावाने (Sharad Pawar) राजकारण फिरतयं, साहेबांनी काहीतरी केलं आहे. त्यांच्या नावाने राजकारण फिरतय हे लक्षात घेतलं पाहिजे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. सर्व धर्म समभाव असं राजकारण साहेबांनी केलं आहे. उगाचं बदनामी करायची. आपण काय केलं?, असा सवाल करत अजित पवारांनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काही जण म्हणत होते हे सरकार पडणार, मात्र, अडीच वर्षे झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुप चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळली आहे, असं अजित पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचं गांडूळ बाहेर निघालं”
“इतक्या दिवसांनी राज ठाकरेंना अक्कल दाढ आली आहे”
WHOच्या दाव्याने खळबळ, कोरोनाच्या ‘या’ व्हेरिएंटने चिंता वाढली
‘राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…’; चंद्रकांत पाटलांकडून जाहीर कौतुक
“शिवतीर्थावरचा कालचा भोंगा भाजपचा आणि स्क्रिप्टही त्यांचीच”
Comments are closed.