नवी दिल्ली | कोरोनाने जगभरात सगळीकडे हातपाय पसरले आहेत. त्यामुळे जवळपास बऱ्याचश्या देशात सध्या लॉकडाऊन आहे. मात्र याच काळात हनिमूनला गेलेल्या एका जोडप्याला कोरोनाचा फायदाच झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात दक्षिण आफ्रिकेचं जोडपं मालदीवच्या एका रेसॉर्टमध्ये अडकलं आहे. देशांमध्ये लॉकडाउन आणि उड्डाण सेवा रद्द केल्यामुळे ते गेल्या 15 दिवसांपासून लक्झरी रिसॉर्टमध्ये अडकले आहेत.
जेव्हा अनेक देशांमध्ये उड्डान सेवा रद्द करण्याची घोषणा केली जात होती, तेव्हा लक्झरी रिसॉर्टमधील इतर प्रवाशांनी तिथून आपापल्या मार्गाने निघून जाण्यात यशस्वी झाले. पण मालदीवहून दक्षिण आफ्रिकेला थेट उड्डाण नसल्यामुळे हे जोडपं रिसॉर्टमध्ये अडकलं. यावेळी हॉटेलने मात्र त्यांना मदतीचा हात देत फुकटमध्ये (विना मुल्य) त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.
दरम्यान, या जोडप्याने आता श्रीलंकेतील दक्षिण आफ्रिकेच्या दूतावास आणि मालदीवच्या दक्षिण आफ्रिकन वाणिज्य दूतावासाकडे संपर्क साधला. आता त्यांना चार्टर्ड विमान पाठवून मायदेशी घेऊन येणार आहेत.जेव्हा अनेक देशांमध्ये उड्डाण सेवा रद्द करण्याची घोषणा केली जात होती, तेव्हा लक्झरी रिसॉर्टमधील इतर प्रवासी तेथून निघून जाण्यात यशस्वी झाले. पण मालदीवहून दक्षिण आफ्रिकेला थेट उड्डाण नसल्यामुळे हे जोडपं रिसॉर्टमध्ये अडकलं.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!
पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर
महत्वाच्या बातम्या-
त्यांना हे बोलायचा अधिकार कुणी दिला??- सुनिल गावसकर
ही लढाई दीर्घकाळ चालेल, पण आपल्याला थांबायचं नाही- नरेंद्र मोदी
कोरोनाला पळविण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार, पाहा व्हिडीओ
Comments are closed.