द.आफ्रिकेचा धुव्वा, भारताची उपांत्य फेरीत धडक

लंडन | चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महत्वपूर्ण सामन्यात भारताने द.आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला. द. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारताला विजयासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं होतं. भारतानं ते आव्हान ८ गडी आणि ७२ चेंडू राखून पार केलं.

द.आफ्रिकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली. मात्र मात्र धावगती वाढवण्याच्या नादात त्यांचे खेळाडू ठराविक अंतराने बाद होत गेले. भारताकडून शिखर धवननं सर्वाधिक ७८ तर विराट कोहलीनं ७६ धावांची खेळी केली.