“फडणवीस अजित पवारांना तुरुंगात पाठवणार होते पण…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना अजूनही टार्गेट केलं जातं. त्यातच शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी देखील त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस इतक्या दिवस अजित पवारांवर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी करत होते.मात्र, आज ते अजित पवार (Ajit Pawar ) यांना सोबत घेऊन सत्तेत आहे. यावरून ठाकरे गटाने टोलबाजी केली आहे.

आजच्या सामनाच्या अग्रलेखात थेट अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपच्या मांडीवर! शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात भाजपच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.

फडणवीसांवर बदनामीचा खटलाच दाखल करा!

भ्रष्टाचारी मंडळींवर आधी आरोप करायचे व मग निर्लज्जपणे त्यांना मांडीवर घेऊन बसायचे. गेल्या दहा वर्षांत जेवढे घोटाळे झाले ते गेल्या 70-75 वर्षांत झाले नसतील. गेल्या दहा वर्षांत खोटेपणाचे जेवढे उंच डोंगर उभे केले, त्यापुढे हिमालयाची उंचीही तोकडी पडेल, असं अग्रलेखात म्हटलंय.

हर्षवर्धन पाटील, हसन मुश्रीफ यांच्याप्रमाणे आता अजित पवारांनाही (Ajit Pawar ) शांत झोप लागायला सुरुवात होईल. राज्य बँक घोटाळ्यामुळे अजित पवारांना नाहक मनस्ताप झाला. त्यांना कुटुंब-पक्षाचा त्याग करावा लागला. बदनामी झाली ती वेगळीच. सुनेत्रा पवार, फडणवीसांवर बदनामीचा खटलाच दाखल करा!, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना साथ देण्याची ‘मोदी गॅरंटी’

ज्या राज्य बँक घोटाळय़ात देवेंद्र फडणवीस अजित पवार (Ajit Pawar ) यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते, पण त्या घोटाळ्य़ाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला. अजित पवारांविरोधात पोलिसांना काहीच ठोस सापडत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. अशा तऱ्हेने भाजपने पवारांना एकापाठोपाठ एक असा दिलासा देण्याचा सपाटाच लावला आहे, असंही अग्रलेखात म्हटलंय.

अजित पवारांच्या कथित बँक घोटाळ्यांवर फडणवीस यांनी तांडव केले होते. महाराष्ट्रात जनतेचा पैसा पवारांनी व त्यांच्या गँगने लुटल्याचा आरोपच नव्हे, तर आपल्याकडे पुरावे असल्याचे ते सांगत होते. आता या पुराव्यांचे काय झाले? हे पुरावे त्यांनी गिळून ढेकर दिला की आणखी काही केले? भ्रष्टाचाऱ्यांना, गुन्हेगारांना साथ देण्याची ‘मोदी गॅरंटी’ फडणवीस यांनी अमलात आणली ती अशी. फडणवीसांनी शिखर बँक घोटाळ्य़ाचे पुरावे नष्ट केले असतील तर त्या आरोपाखाली फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीच सामनामध्ये करण्यात आली आहे.

“काकांच्या पाठीत सुरा खुपसण्यास भाग पाडल्याच्या..”

पुराव्यांशी छेडछाड करणे हा अपराध आहे. पोलिसांनी पुरावा असतानाही कुणाच्या दबावामुळे अजित पवारांची शिखर बँक घोटाळा फाईल बंद केली असेल तर महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुंबईच्या पोलीस आयुक्तांना ‘पार्टी’ करून हायकोर्टातदेखील दाद मागायला हवी. कारण ‘भ्रष्टाचार भ्रष्टाचार’ असे ओरडत राहून जमिनीवर काठ्या आपटायच्या व माहौल निर्माण करायचा हे यांचे धंदे आहेत. तिसरा पर्याय म्हणजे समाजसेविका सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार (Ajit Pawar ) यांची बदनामी केल्याप्रकरणी, कुटुंबास मनस्ताप देऊन काकांच्या पाठीत सुरा खुपसण्यास भाग पाडल्याच्या सबबीखाली देवेंद्र फडणवीस व त्यांच्या लोकांवर अब्रुनुकसानीचा खटलाच चालवायला हवा!, असा खोचक टोला सामनाच्या अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

News Title-  Saamana Editorial On Ajit Pawar and Sunetra Pawar

महत्त्वाच्या बातम्या –

“अभिनेत्याच्या मुलाचं कौतुक होत होतं पण…”, सुशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

IPL ला 20 दिवस बाकी अन् धोनीच्या CSK ला मोठा धक्का; स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर

मोठी बातमी | IPL 2024 च्या तोंडावर अशुभ घटना, गुजरातच्या ‘या’ स्टार खेळाडूचा मोठा अपघात

प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने मोठा गोंधळ, महाविकास आघाडीत झाली बिघाडी?

“यांनी पार माझी पोरं सोडली नाहीत…,” भर सभेत सुप्रिया सुळे यांनी सांगितलं असं काही…