Top News महाराष्ट्र मुंबई

“चांगल्या कामात केंद्र सरकारचं मांजर का आडवं जातं?”

मुंबई |  कांजूरमार्गला मेट्रो कारशेड झाल्याने केंद्र सरकारवर आकाश कोसळणार नाही. मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर आहेत. त्यामुळे कदाचित मीठ आयुक्तांना महाराष्ट्राचे मीठ अळणी लागत असेल, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मुंबईच्या विकासात खोडा घालण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. मुंबई कारशेड आरेच्या जंगलातून कांजूरमार्गच्या ओसाड जागेवर हलवली. पण ही जागा राज्य सरकारची नाही, तर केंद्राची असल्याचा वाद भाजपच्या पुढाऱ्यांनी सुरु केला असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.

केंद्र सरकार पाकिस्तान किंवा बांग्लादेशचं नाही ना? ते आपलेच आहे. चांगल्या कामात केंद्र सरकारचं मांजर का आडवे जातं? असा खोचक सवालही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

दरम्यान, कोणी कितीही उपद्व्याप करा. बुलेट ट्रेनला मागे टाकून कांजुरची मेट्रो कारशेड पुढे जाईल, राजकीय मिठाचा सत्याग्रह कारशेड रोखू शकणार नाही, असं आव्हानही अग्रलेखातून देण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल- संजय राऊत

मी ऊसतोड कामगाराचाच मुलगा, ऊसतोड कामगारांना विशेष सहाय्य मिळवून देणार- धनंजय मुंडे

आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे- देवेंद्र फडणवीस

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुणे पोलिसांकडून अटक; पाहा काय आहे प्रकरण…

आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत नवीन दर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या