महाराष्ट्र मुंबई

“कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या”

चीनचा दुष्टपणा त्यांच्या वाकड्या नजरेतही स्पष्ट दिसतो. पण ते वाकडे डोळे काढून त्यांच्या हातात देण्याचे शौर्य आता गाजवायला हवे. आजार बळावला आहे. तो टोकास जाण्याआधीच पंतप्रधानांनी शस्त्रक्रिया करावी हे बरे. कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या, अशी अपेक्षा शिवसेनेने आजच्या सामना संपादकीयमधून व्यक्त केली आहे.

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे–

कारगिल दिन हा हिंदुस्थानी लष्कराच्या शौर्य आणि पराक्रमाचा विजयोत्सव असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल म्हटले आहे. संरक्षणमंत्री पुढे सांगतात की, आमच्याकडे कोणी वाकडय़ा नजरेने पाहिले तर त्यांना सडेतोड उत्तर देऊ. संरक्षणमंत्री यांचे भाषण टोकदार तितकेच मनगटे पेटवणारे आहे. पण सध्या आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने कोण पाहत आहे? वाकडय़ा नजरेने पाहणाऱ्यांना आपण सडेतोड उत्तर नक्की कधी देणार आहोत?

पंतप्रधान मोदी यांनी तर त्यांच्या ‘मन की बात’मध्ये चीनचे नावही घेतले नाही. देशाची जनता मनकवडी आहे. त्यामुळे लोकांनीच काय ते समजून घ्यावे, असे पंतप्रधानांनी ठरवून टाकले आहे. पाकिस्तानचे कारगिल युद्ध झाले व आमच्या जवानांनी मोठी किंमत मोजून ते जिंकले. म्हणून पाकिस्तानचे संकट संपलेले नाही. पण आता गलवान खोऱ्यात 14 हजार फुटांवर चीन घुसतोय व तेथे तणावाची स्थिती आहे. आपले 20 जवान शहीद झाले. त्यांच्या हौतात्म्याचा बदला आपण घेतला नाही.

पेंगाँग, डेपाचंग भागातून चिनी सैन्य अजूनही हटलेले नाही. पण त्याबाबत चर्चा मात्र सुरू आहे. चिनी सैन्य आधी हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले. दहा किलोमीटर घुसल्यावर चर्चा करून दोन किलोमीटर मागे गेले. म्हणजे आठ किलोमीटरची जमीन त्यांनी त्यांच्या ताब्यात ठेवली आहे. पण आपलीच दोन किलोमीटर जमीन सोडल्याचा राजकीय आनंदोत्सव साजरा होतोय. चीन हिंदुस्थानच्या हद्दीत घुसला आहे व मागे हटायचे नाव घेत नाही. म्हणजे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघण्याचाच हा प्रकार आहे.

चिन्यांचे डोळे माकडांप्रमाणे लहान आहेत. त्यामुळे चिनी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहत आहेत हे कुणाला दिसत नसेल तर प्रश्नच संपला. प्रश्न इतकाच आहे की, पाकिस्तानने हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यास 21 वर्षे होऊन गेली. पाकडय़ांचा तो स्वभाव आहे. इतिहासात अफझल खानाने छत्रपती शिवरायांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करताच छत्रपतींनी अफझल खानाचा कोथळाच काढला व त्याचे थडगे प्रतापगडाच्या पायथ्याशी सरकारी इतमामात बांधले. तसे काही चीनच्या बाबतीत घडल्याचे दिसले नाही.

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक वगैरे करूनही त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच. यावर पंतप्रधान मोदी यांनी असे लॉजिक मांडले की, ‘पाकिस्तान दुष्ट आहे. दुष्टांचा स्वभाव काही केल्या आपण बदलवू शकत नाही. दुष्ट स्वभावाची माणसे काही कारणाशिवाय कोणाशीही वैर घेतात. वैर घेणे हा त्यांचा स्वभावच असतो. हिंदुस्थानने पाकिस्तानबरोबर नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला. मात्र पाकिस्तानने हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसण्याचाच प्रयत्न केला.’ पंतप्रधान मोदी यांनी सत्य तेच सांगितले. पण हेच ‘मैत्रीचा हात’ प्रकरण चीनच्या बाबतीतही लागू पडते.

दुष्टपणा त्यांच्या वाकडय़ा नजरेतही स्पष्ट दिसतो. पण ते वाकडे डोळे काढून त्यांच्या हातात देण्याचे शौर्य आता गाजवायला हवे. आजार बळावला आहे. तो टोकास जाण्याआधीच पंतप्रधानांनी शस्त्रक्रिया करावी हे बरे. कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या! कारगिल विजय दिवसाचा हाच संदेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा हात, आव्हाडांनी सांगितलं टॉप सिक्रेट!

पोलिसांचे कार्य आणि जनतेचे कर्तव्य सांगणाऱ्या या गाण्याचे गृहमंत्र्यांकडून अनावरण

“मुख्यमंत्री घरी बसून काळजीपूर्वक काम करत आहेत, आम्ही सर्व त्याचे साक्षीदार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या