Uddhav Thackeray 3 - पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे- उद्धव ठाकरे
- Top News

पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे- उद्धव ठाकरे

मुंबई | अयोध्येत प्रभू रामचंद्रांचा पुतळा उभारण्याची घोषणा योगी सरकारने केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. 

आजवर बोधीवृक्ष माहित होता, पण आता जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा जो ‘मोदी-वृक्ष’ निर्माण झाला आहे त्या झाडाची पाने पाचोळ्यासारखी अयोध्येतही उडू लागली आहेत, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून हिंदूंनी सावध राहावे, असंही या अग्रलेखात म्हणण्यात आलंय. 

दरम्यान, कारसेवकांची मागणी राममंदिराची होती. पण सरकारने त्यांना पुतळा व फैजाबादचे नामकरण दिले, असं या अग्रलेखात म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अवनी प्रकरणी नितीन गडकरींची सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चीट

-युतीसाठी शिवसेनेला हात जोडून विनंती करत आहे- चंद्रकांत पाटील

-बाळा… त्यांना खायला घालू नकोस, अरे ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत!

-मेनका गांधींच्या भावना मी समजू शकतो- मुख्यमंत्री

-…नाहीतर त्या नक्षलवादाचे नेतृत्व मी करेन- उदयनराजे भोसले

या बातमीवर तुमची कमेंट लिहा