बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मिठाच्या खड्यावरुन राजकारण तापलं; सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांना कानपिचक्या

मुंबई | विरोधकांना अंगावर घेत असताना शिवसेना खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील वेळप्रसंगी टीकेचे लक्ष्य केले आहे. आता अजित पवार यांनी संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत संजय राऊत यांनी त्यांच्यावर नाव न घेता टीकेचे बाण सोडले आहेत.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रिपद दिलं, असं संजय राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’ या सदरात लिहिलं होतं. त्यावर बोलताना महाविकास आघाडीमध्ये कुणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नये, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपवर टीका करताना संजय राऊत लिहितात, “ठाकरे सरकारला सुरुंग लागेल व विरोधी बाकांवरुन सत्ताधारी बाकांवर जाता येईल या भ्रमातून विरोधकांनी बाहेर पडले पाहिजे. पुन्हा भल्या पहाटे मिठाचा खडा टाकून दूध नासवायचा प्रयत्न एकदा भलेही झाला, आता असा काही नासवानासवीचा प्रकार होऊ शकणार नाही. एक वेळ दुधात पडलेला मिठाचा खडा बाहेर काढता येईल पण गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे दूर होणे कठीण.” अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीचा इथे संदर्भ जोडण्यात आलेला आहे.

‘पित्त का खवळतंय?’ या शिर्षकाखाली लिहिलेल्या याच अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. अहमदाबादच्या गुप्त भेटीची अफवा पसरवून शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर आघात करायचा आणि महाराष्ट्रातील सरकार कमकुवत करायचे हा भाजपचा डाव आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे पण पित्त भाजपचे खवळले आहे. शरद पवार लवकर बरे होऊन कामाला लागतील, भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे, असंही या अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

शिवसेना का सोडली?; नरेंद्र पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

“सॅम करनमध्ये मला महेंद्रसिंग धोनीची झलक पहायला मिळते”

शरद पवार यांच्यावर रात्री तातडीची शस्त्रक्रिया, प्रकृतीबाबत राजेश टोपे यांनी दिली माहिती

आयपीएलच्या सर्व संघांना मोठा धक्का, बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मोठी बातमी! शताब्दी एक्सप्रेसच्या आगीनंतर भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More