Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल- संजय राऊत

मुंबई | राज्यात अघोषित आणिबाणी असून सरकार विरोधात कोण काही बोललं तर त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. याच मुद्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधत फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल, पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला, असं राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

अठरा दिवसांपासून पंजाब-हरियाणाचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास आणीबाणीचा कोणता प्रकार मानायचा?, असा सवालही अग्रलेखातून करण्यात आला आहे.

दरम्यान, फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं पण पहिली तान घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचं शास्त्र आहे. पण शास्त्रीय गायन सुरू असतानाच ‘डीजे’ लावावा तसं घडलं, असल्याचं राऊत यानी अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर या नटीबाईची भाजप कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी!”

“…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं”

अहमद भाईंमुळे अनेकांचा शपथविधी झाला, त्यांनी अनेकांना मुख्यमंत्री, मंत्री बनवलं- देवेंद्र फडणवीस

ऋतिक-कंगणा प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे; कंगणा संतापली, म्हणाल…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या