Top News महाराष्ट्र मुंबई

“…तर या नटीबाईची भाजप कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी!”

मुंबई | राज्यात अघोषित आणिबाणी असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत राज्य सरकारवर टीका केली होती. यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

मुंबईला पाकिस्तान, पोलिसांना माफिया वगैरे बोलणे हे विरोधी पक्षाला मान्य आहे काय? तसं असेल तर या नटीबाईची भाजप कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी. तुमचे संस्कार आणि संस्कृती चव्हाट्यावर येऊ द्या, असं म्हणतअग्रलेखातून अभिनेत्री कंगणावरून भाजपला निशाण्यावर धरलं आहे.

एक वृत्तवाहिनीचा मालक मराठी उद्योजकास आत्महत्या करण्यास भाग पाडतो, हा साधा गुन्हा आहे काय? बाकी त्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी, घाणेरड्या भाषेत उल्लेख केला ते तूर्त बाजूला ठेवा. त्याबद्दल भाजपने त्याचे शाल व श्रीफळ देऊन कौतुक करावं, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, आणीबाणीसंदर्भात फडणवीस यांनी कोणतीही ठोस उदाहरणे समोर आणली नाहीत. पण राज्यातील वातावरण चांगले नाही, असं पालुपद त्यांनी चालवलं असल्याचं म्हणत अग्रलेखातून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला.

थोडक्यात बातम्या-

“…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं

अहमद भाईंमुळे अनेकांचा शपथविधी झाला, त्यांनी अनेकांना मुख्यमंत्री, मंत्री बनवलं- देवेंद्र फडणवीस

ऋतिक-कंगणा प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे; कंगणा संतापली, म्हणाली

गुड न्यूज! अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस

अधिवेशन आणि कॅबिनेटच्या बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नको आहेत- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या