Top News महाराष्ट्र मुंबई

“…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं”

मुंबई | राज्याच्या दोन दिवसीय हविाळी अधिवेशनाला काल सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अधिवेशन सुरू होण्यापुर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर सभागृहाच्या परिसरात ढोल आणि मागण्यांचा बोर्ड लावून येत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पडळकरांवर निशाणा साधण्यात आला आहे.

हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं पण फेकूचंदना लोकशाही मार्गाने ढोल वाजवून निषेध करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाची भूमिका असल्याचं अग्रलेखात नमूद केलं आहे.

दरम्यान, राज्यात अघोषित आणीबाणी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या अगोदर केली होती. याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

अहमद भाईंमुळे अनेकांचा शपथविधी झाला, त्यांनी अनेकांना मुख्यमंत्री, मंत्री बनवलं- देवेंद्र फडणवीस

ऋतिक-कंगणा प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे; कंगणा संतापली, म्हणाली…

गुड न्यूज! अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस

अधिवेशन आणि कॅबिनेटच्या बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नको आहेत- नारायण राणे

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार- अण्णा हजारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या