Top News महाराष्ट्र मुंबई

दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांवर बाण

मुंबई | शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. विरोधी पक्षाने आपली भूमिका जोरकसपणे मांडायला हवी. पण आम्हाला कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करू असे वारंवार सांगणे हे मोदी यांच्या पक्षाला शोभणारे नाही, असं म्हणत टीका केली आहे.

बहुमताची सरकारे दाबदबावाने अस्थिर करायची व त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात अराजकाची चूड लावायची हे तंत्र अघोरी आहे. त्यांनी धमकी दिलीच आहे. आता कृती करून दाखवावी, असं म्हणत शिवसेनेनं भाजपला डिवचलं आहे.

डिसेंबरनंतर ते पुढची तारीख देतील. अशा तारखांवरील तारखा पडतच राहतील आणि पाच वर्षे कधी निघून गेली हे चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांना कळणार नाही. हा खेळ फारच रंजक आहे . दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल, असं म्हणत शिवसेनेनं टोला लगावला आहे.

लोकशाहीत हार प्रहार पचवायला शिकले पाहिजे. पण महाराष्ट्रातील भाजपच्या कारभाऱ्यांना हे तत्त्व मान्य नाही. राज्यातील नवी घडी त्यांना मान्य नाही. त्याबद्दलचा संताप किंवा निराशा आम्ही समजू शकतो, पण राज्यातील नवी घडी विस्कटूनच टाकायची व अराजक निर्माण करून हा विकृत आनंद घ्यायचाच असे या मंडळींनी ठरवलेले दिसते, असं अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??”

शिवजयंतीपासून महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी सांगितलं पहिल्या प्रेमाचं गुपित

‘माझ्या समाजासाठी शरद पवारच मोठा आधार’; हा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या