Top News महाराष्ट्र मुंबई

“हजारो कुटुंबांच्या जीवनात आनंदवन फुलवणाऱ्या आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावं?”

मुंबई | डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. शीतल आमटे यांच्या दुर्दैवी आत्महत्येची बातमी मन सुन्न करून गेली. हजारो कुटुंबांच्या जीवनात ‘आनंदवन’ फुलविणाऱ्या, त्यांच्या जखमा भरून काढणाऱ्या आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावे?, असं राऊत यांनी अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

फक्त आमटे कुटुंबासाठीच नाही, तर अवघ्या महाराष्ट्रासाठी, बाबा आमटे यांच्यावर प्रेम करणा-या लाखो लोकांसाठी ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हे संकट पेलण्याची ताकद परमेश्वर आमटे कुटुंबाला देवो, हीच प्रार्थना!, अशा भावना अग्रलेखातून व्यक्त करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शीतल आमटेंनी आत्महत्या करण्यापुर्वी‘युद्ध आणि शांतता’ असं कॅप्शन देत आपलेच एक कॅनव्हास पेंटिंग त्यांनी ट्विट केलं होतं. त्यामुळे कोणत युद्ध आणि कोणती शांतता त्यांच्या मनात होती या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

‘आहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल सांगून टाका…’; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

विद्या बालनने डिनरसाठी नकार दिल्याने ‘या’ मंत्र्याने थांबवलं सिनेमाचं चित्रीकरण

…तर जयंत पाटील भाजपमध्ये असते- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या